STORYMIRROR

Gouri Santosh

Abstract

3  

Gouri Santosh

Abstract

उधाणलेले..!!!

उधाणलेले..!!!

1 min
169


केशरी सडा या गगनी

 उधाणलेल्या किरणांतुनी

 अलवार निरोप घेता

 निशेच्या आल्हाद क्षणांतुनी. . ! 


नभ अल्लड तारकांचे

 विसावले या प्रहरांतुनी

 खेळकर रवि तो पाहे

 मिश्किल आपल्या हास्यातुनी. . ! 


श्वास हे मुक्त झाले

 उत्साही या जागण्यातुनी

 उमलू दे या धरेवरती

 आश्वासक तव करांतुनी. .!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract