चारोळ्या
चारोळ्या
सहज एकदा.....!
कोसळला पाऊस धुंद आज
परि मृदगंधाला होता पारखा,
कदाचित निसटलेल्या क्षणांचा
बांधला असेल त्यानेही आडाखा..!
तेव्हा सारखा शुभ्र मोगरा
आजही फुलतो दारात माझ्या,
बिचाऱ्याला माहित नाही की
जागाच हरवल्यात माळण्याच्या त्याच्या..!
रातराणीच्या मंद फुलण्याने
गंधाळून गेला सारा घाट,
जागून पाहिली मग मीही
पाणावलेली मोकळीच पहाट..!
विसरू आता संपले सारे
कोरड्या मनाने म्हणालीस जेव्हा,
वाट पाहिली अखेर ऐकावे एकदा
थांब जरा, जा, मग , पाऊस थांबेल तेव्हा...!
