निशिगंध....!!!
निशिगंध....!!!
मोहरलेला शुभ्र निशिगंध
ओल्या आठवणी जागवतो.,
जुन्या हळव्या जखमांना
पुन्हा एकदा ओलावतो.....
सचेत मनाच्या भासांना
व्यर्थ का म्हणून खुणावतो.,
तापलेल्या जगण्याचे कशाला
श्वास कासावीस करून जातो....
कातर क्षणाच्या हिंदोळ्यावर
मंतरलेला काळ हेलकावतो.,
उसवलेल्या माझ्या जगण्यात
हरवल्या नजरेचे धागे शोधतो.... !!!
