STORYMIRROR

Gouri Santosh

Fantasy

3  

Gouri Santosh

Fantasy

स्वप्न...!!!!

स्वप्न...!!!!

1 min
209

रात जागवी मखमाली स्वप्नांची

 हातीही न येती पंखांची इवल्या, 

 तरीही धावते मागे त्यांच्या

 ओढ अनामिक सादे आपल्या..! 


अनेक स्वप्ने मनाच्या तळाशी

 नेहमी भिरभिर मुक्त संचार, 

 गुज मनीचे केवळ त्या स्वप्नांशी

 भय सकाळचे रात कातर.. ! 


यावे एकच स्वप्न हाताशी

 निसटावी नियतीही बंध मोकळा, 

 एकरूप मी माझ्याच जगण्याशी

 धाव आकाशी मोकळ्या दिशा. . !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy