मतदारराजा
मतदारराजा
हे मतदारराजा
तुला लोकशाहीची शपथ
नग होऊस बैमानं
दे ईचारानं मत...
नातागोत्याला ईसरं
मांड लोकशाहीचा जागरं
जरा रहा तु जपुन
तुला घेतील ईकतं...
ही पुढारी माणसं
जणु ईकाची कणसं
नग लावुस व्हटाला
होईल तुझा घात...
ते देतील रं तुला
पैका दारु नी बायका
नगं सोडुस रं खुळ्या
तु ईकासाची साथ...
संविधानात लिव्हलं
मतदान हे हक्काचं
शाई लावुन बोटाला
तु मिरवं थाटातं...
