STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आक्रोश गर्भाचा

आक्रोश गर्भाचा

1 min
166

नको रडू आई

हुंदके देऊन

धडधडतंय

रडणं ऐकून


अचानक माझी

चाहूल गर्भात

नको कुणी मला

ओरडे जोरात


जन्म घ्यायचाय

नको गं उन्मळू

मोठं व्हायचंय

नको गं कुस्करु


शिकून आधार

देईन तुम्हांला

जीव घाबरला

नको शिक्षा मला


दुर्दैवाने लढा

आस्तित्वाचा देते

वेळ गर्भावर

नशिबाने येते


खरंच सांगते

नको गं रडूस

धक्के बसतात

घे गं सांभाळून


जग बघायचं

खूप शिकायचं

जगात येऊन

नाव काढायचं



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract