STORYMIRROR

डायरी ऑफ विमा

Abstract Inspirational Others

3  

डायरी ऑफ विमा

Abstract Inspirational Others

एकाकी

एकाकी

1 min
225

एकट्याने एकट्याशी बोलले पाहिजे

शब्दांनीही भाव वेडे तोलले पाहिजे


कोण वेडे आहे ऐकण्या पुन्हा पुन्हा

आपुलकीचे रोप येथे रोवले पाहिजे


दु:खा मध्ये रमून जाणे रोजचेच आहे

आनंदाचे झाड मनात वाढले पाहिजे


स्वत: साठी जग जगते त्यात काय मोठे

दुसऱ्यासाठी कधीतरी जगले पाहिजे


आपले आपले करता हात रिक्त होती

दुसऱ्याच्या आनंदाने मोहरले पाहिजे


आनंदाने जगताना जपले ही पाहिजे

जपण्यासाठी कधी दूर झाले पाहिजे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract