STORYMIRROR

डायरी ऑफ विमा

Abstract Tragedy Inspirational

3  

डायरी ऑफ विमा

Abstract Tragedy Inspirational

दिवाळी तशीच आहे

दिवाळी तशीच आहे

1 min
142


चार का होईना पण डबे आजही

फराळाचे भरतात

नऊ वाजता उठणारे एक दिवस का होईना 

पण चार वाजता उठतात

आज ही दिवाळी तशीच आहे...


डिओ,शाम्पू,बदामाच्या तेलानी जरी

कपाटे भरली असली

तरी मोती साबण आवर्जून घरी येतो

अनारसे, करंजीचा नैवेद्य 

पूजेच्या थाळीत आजही सजतो

आज ही दिवाळी तशीच आहे...


थोडे फटाके सुद्धा वाजतात

धुर सुद्धा होतो

मातीच्या पणत्यांनी कानाकोपरा उजळतो

फक्त आजच्याच दिवस हं!

म्हणून गोडबोल्यानां सुट मिळते

शुगर जर वाढली तरच दिवाळी वाटते

आज ही दिवाळी तशीच आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract