आयुष्यही चित्रपटा सारखं असतं
आयुष्यही चित्रपटा सारखं असतं
बघायला गेलं तर
आयुष्यही चित्रपटा सारखं असतं…
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असतं…
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात…
तोंड देता आले तर
संकट ही शुल्लक असतं…
वाटायला गेलं तर
अश्रूंत ही समाधान असतं…
पचवायला गेलं तर
अपयश ही सोपं असतं…
हसायला गेलं तर
रडणेही आपलं असतं…
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपं असतं..
आयुष्यही चित्रपटासारखं असतं..
