STORYMIRROR

डायरी ऑफ विमा

Romance Tragedy Classics

3  

डायरी ऑफ विमा

Romance Tragedy Classics

मन माझं सैरभैर

मन माझं सैरभैर

1 min
142

अवखळ वारा

रिमझिम धारा

हळूहळू सांजवता

वाटतं ... तू येशील आता


पावसानं झालंय

ओलंचिंब रान

मातीलाही सुचलंय

दरवळणारं गाणं


मन माझं हेलकावतंय

विरहाच्या लाटेवर

नजर लावून बसलंय

तुझ्या नेहमीच्या वाटेवर


असेच एकदा आठवणींचे

मेघ भरून आलेले

नकळत डोळ्यातून

झरुन गेलेले


तुझी वाट पाहत तिथे

भिजलो होतो चिंब

म्हणून कुणा दिसले नाहीत

आसवांचे थेंब


नाहीतर मित्रांना

हे गुपित कळलं असतं

खरं सांगतो त्यांनी मला

खूप-खूप छळलं असतं


आता हळूहळू

होऊ लागलेय रात

मंद मंद जळते आहे

दिव्यामधील वात


झोपलीत पाखरं

गाणं गात गात

मन माझं सैरभैर

तुझी वाट पाहत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance