व्हॅलेंटाईन दिनी
व्हॅलेंटाईन दिनी
कोणे एके काळी
व्हॅलेंटाईन दिनी
मोठ्या उत्सुकतेने
मी आणली होती साडी
होती जरी साधी
ती खुश मात्र झाली
प्रयत्न केला खूप तिने
पण नीट नेसता नाही आली
गोंधळली क्षणभर हसली
ती म्हटली
ध्यानात आहे माझ्या
तूझे प्रेम माझ्या भाळी
पण गोड आठवण प्रेमाची
तिने अजूनही जपून ठेवली