STORYMIRROR

Supriya Devkar

Abstract Tragedy

3  

Supriya Devkar

Abstract Tragedy

का जगावे?

का जगावे?

1 min
204

का जगावे प्रश्न असा 

भेडसावतोय का?

का मिळाले जिवन 

उत्तर शोधताय का?


उभे समोर आयुष्य पुरे 

तरीही दुःख का?

जगण्यात मिळे आनंद 

तो विसरलात का?


नवनवे विकल्प असती 

तरीही संकोच का?

वाट वेगळी धावताना 

मनात भिती का?


रोज नवी पहाट तरीही 

प्रश्न जगण्याचा का?

अडचणीस सामोरे जाताना 

मनात शंका का?


ऋतू बदलतील रंग आपले 

आपण बदलू का?

मनातल्या वादळावर ताबा 

आपण ठेवू का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract