STORYMIRROR

Rekha Gavit

Inspirational Children

4  

Rekha Gavit

Inspirational Children

लेक...

लेक...

1 min
422

लक्ष्मीच्या पावलाने घरी येते लेक

चैतन्याने फुलते संसाराची लता

जणू आनंदाचा झरा झुळ झुळ वाहे

कुटुंबात येई आनंद आणि सौख्यता!! १!!


लेकीच्या असल्याने घरादारात हर्ष

आईपण लाभे हे तर जन्माचं देणं

मायेचचं रूप जणू घरात नांदे

माय लेकीचं नातं जसं सौख्याचा लेणं!! २!!


मनातले गुज होतं तिच्यासवे व्यक्त

मैत्रीचं नातं अलवार उमले

हळुवार उलगडे नव्याने धडे

जीवनाची आव्हाने समर्थ झेले!! ३!!


जीव घेतो कलेकलेने आकार

शिक्षणाने लेकीची जाते उंच भरारी

आत्मनिर्भर, गुणी, कला तिची जोपासू

आशीर्वाद देऊ भेदून टाक दुनिया सारी!! ४!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational