STORYMIRROR

Rekha Gavit

Others

4  

Rekha Gavit

Others

ती....मुक्त

ती....मुक्त

1 min
220

गर्भातल्या तिचा होई सन्मान

वाजत-गाजत होई स्वागत छान

कन्यारत्न जेव्हा आसमंती चमके

तेव्हा स्वतंत्रतेचा नवा अर्थ उमले....

जीवनाच्या या बागेत 

बहु फुलांच्या गर्दीत

उमले जेव्हा अबोल कळी

तेव्हा स्वतंत्रतेचा नवा अर्थ उमले...

सूनसान त्या अनेक रात्री

निर्जन स्थळी अन गल्ली

सुरक्षित जेव्हा दुनिया ची सारी दारे

तेव्हा स्वतंत्रतेचा नवा अर्थ उमले...

हुंडा न काही मौल्यवान ऐवज

मानपान, सन्मान झुगारून सारे

कन्यादान करी जेव्हा सुखाने पिता

तेव्हा स्वतंत्रतेचा नवा अर्थ उमले....


Rate this content
Log in