STORYMIRROR

Vishwajeet Thite patil

Abstract

3  

Vishwajeet Thite patil

Abstract

प्रेम सप्ताह

प्रेम सप्ताह

1 min
213

फेब्रुवारी महिना आला

अन् प्रेम सप्ताह ही सुरू झाला


आयुष्यात आहेत अपयशाचे काटे

त्यात तिला गुलाब कसे द्यावे 


तिच्या होकारासाठी धावत राहिलो तिच्या मागे

तर विसरून जाईन आता मी कुठं आहे


मेसचं बेचव जेवण खाऊन काढतोय मीच माझे दिवस

त्यात तिला महागडं चॉकलेट घेऊन देणार कसं


जी तिच्या नजरेनेच खेळवते मला

तिला बावल्याची गरज कशाला 


कशाची वचने, सारे काही तिला वाटे गंमत 

कधीतरी कळू दे तिलाही माझ्या भावनांची किंमत 


नकोय कसली गळाभेट अन् स्पर्श कशाचा

हवाय फक्त तिच्या नजरेने होकाराचा इशारा 


वाटेत येता जाता होणारी भेट आपली

आहे तीच माझ्या खिशाला परवडणारी


जिम्मेदारी व परीक्षेमुळे भावनांना घेतलं आवरून 

प्रेम सप्ताह अभ्यासात व्यस्त राहून गेलाय कोमेजुन                 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract