STORYMIRROR

Vishwajeet Thite patil

Romance Tragedy

3  

Vishwajeet Thite patil

Romance Tragedy

मलाही वाटतं...

मलाही वाटतं...

1 min
340

मलाही वाटतं...

मी तुझ्या प्रेमात पडावं...

तुझ्या आठवणीत बेधुंद रमावं

बारीक सारीक गोष्टींवर भांडावं

काही काळ अबोल रहावं

आणि नंतर मात्र प्रेमाचं भांडं उतू जावं


मलाही वाटतं...

मी तुझ्या प्रेमात पडावं...

या जग विहारण्याचा मुक्त घ्यावं

थोडंसं अल्लड थोडंसं खट्याळ होऊन बागडावं

लहान लेकरांप्रमाणे तुझ्या कुशीत निजावं

आणि अलगद हातांनी मायेनं कुरवळत बसावं


मलाही वाटतं...

मी तुझ्या प्रेमात पडावं...

माझ्या नयनातील अश्रूंना अलगद पुसावं

सुख दुःखाच्या वाटेवर पावलांवर पाऊल ठेवून चालावं

तुझ्या यशामध्ये खारीचा वाटा उचलावं

आणि तू माझ्या जीवनाचा भागीदार व्हावं


मलाही वाटतं...

मी तुझ्या प्रेमात पडावं...

कधीतरी तासनतास बोलत बसावं

अनपेक्षित भेटीत अलगद केसांमध्ये फुल माळावं

त्या फुलाच्या सुगंधात मी दरवळावं

आणि दरवळणाऱ्या सुगंधात तू धुंद व्हावं


मलाही वाटतं...

मी तुझ्या प्रेमात पडावं...

मन आणि बुद्धीच्या खेळात मन जिंकावं

पण बुद्धीच्या पुढे मन हारतं

सर्व मनाच्या भावनांवर पाणी फिरतं

आणि बुद्धीचं एकवार चालणं सुरू होतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance