परतीचा पाऊस
परतीचा पाऊस
1 min
44
जुळलं तुझं नातं, कोड पडला मला
परतीचा पाऊस हा आला तुझं न्यायला
केला तुज पाहुणचार, बोलावलं मज जेवायला
दहा महिने उलटले असतील हा क्षण बघायला
पडेल अंगण हे ओसाड, जाशील तू तुझ्या गावाला
परतीचा तो पाऊस कधी येईल मज भेटायला
मी एकांतात असतांना गार वाऱ्याची झुळक येईल का?
निरोप तुझ्या भेटीचा सांगून मला जाईल का?
ओढ लागली पाऊसाची तू सोबत नसतांना
कळलं नाही प्रेम तुझं जवळ तू असतांना
चिंब तुझ्या आठवणीत मी लागलो पुन्हा झुरायला
श्रावणातील पाऊसमद्ये तुझ्या विना मारायला
गरज भासली तुझी तू येशील का सावरायला
परतीचा पाऊस हा येईल तुला सांगायला
