मी आणि माझा एकांत
मी आणि माझा एकांत
बावऱ्या मनाला लागलेला कवितेचा छंद...
तू आणि तुझा बेधुंद मनाला करणारा आनंद...
नेहमी हसणारा मी निशब्द...
तुला पाहून हरपून गेलेल माझ चित्त...
तरीही का आठवतो मला मी आणि माझा एकांत...!
चहूकडे पसरलेला सोनचाफ्याचा सुगंध...
त्यावरचा मकरंद वाटे मनाला स्वच्छंद...
कृष्णाला आहे त्या रागावलेल्या राधेची खंत...
तरीही का आठवतो मला मी आणि माझा एकांत...!
अफाट गर्दीत मी मला शोधण्यात गर्क...
मग कोणास ठाऊक मी का लावले तर्क...
झोपेतल्या स्वप्नांचा कधीच न झालेला अंत...
तरीही का आठवतो मला मी आणि माझा एकांत...!
कृष्णाने हरपून वाजवलेला पावा...
रातराणी वर प्रकाश देत फिरणारा काजवा..
शांत असलेली रजनी त्यावर झुळुक देणारी हवा...
नकळत बावरे मन झाले शांत...
तरीही का आठवतो मला मी आणि माझा एकांत...
