आठवण प्रेमाची
आठवण प्रेमाची


अंगणात पाऊस, झाले अंगण ओले,
इवलेसे रोप होते, झाड आता झाले
झाड तुझ्या नावाचे, पावसाने झाले ओले
हीच तुझी आठवण, पाऊस थेंबा थेंबाने तोले
बघतेस नजरेत नजर टाकूनी,
स्मित हास्य तोंडावर डोले
पिवळ्या पिवळ्या चिमण्या सुध्दा
पावसात पंख खोले
ओढ ही पाऊसाची मनाला हेलावून बोले
चिमण्यांचे थवे घेई तारांवर सुले
सोड दुःख वेड्या, मन माझ्याशी बोले
मनालाही वाटे पावसात भिजूनी चिंब होवावे ओले
उघडेल आता पाऊस होईल आकाश मोकळे
गावतावरील दवबिंदू मुळे इंद्रधनुष्य आकाशात डोले
सात रंग बघून गिरगीटाचे रूप धारण तू केले
प्रॉमिस केले ओठाने, ते नजरेनं पूर्ण नाही केले
अंगणात पाऊस झाले अंगण हे ओले
इवलेसे रोप होते झाड आता झाले