STORYMIRROR

Vishwajeet Thite patil

Tragedy Others

3  

Vishwajeet Thite patil

Tragedy Others

अदृश्य प्रेम

अदृश्य प्रेम

1 min
269

वेळेतल्या वेळातून वेळ ती काढली,

अमावास्येची रात्र अन प्रेमाची ठिणगी पडली


डोळे अन कान यातलं अंतर चार बोटाचं,

नातं होतं अबोल मनाला खूप टोचायचं


दोन जीव एक श्वास साथ होती दिवसाची

झुंज वारा मोकाट थंडी भीती होती जगाची


जगाच्या विचारापोटी, दिवसाची साथ सुटली

गार थंडी अन रात्रीची वेळ, भेटण्यास योग्य वाटली


विचार होता माझा, जागा होती तिची दोनची वेळ ती ठरली

दारी होती गाडी, दोन मन जोडी, धोक्याची वेळ हीच ठरली


लागली नजर प्रेमाला, जसा चंद्रास डाग

प्रेमाच्या बद्दल्यात म्हणे जीव माझा माग


माझा जीव मी कसा मागू एक वचन मागितलं नीट

वचन आहे मोठं, म्हटलं सांगेल वेळ आली की थेट 


जवळ आली वेळ ती, पुन्हा आठवण त्या वेळेची आली

दारापुढं पाहुण्याची गाडी उभी बघून थंडीची जाणीव झाली


नाही येणार वेळ ती, जी चुकून होती आली 

प्रेमाच्या नावाने तू, तुझी गरज पूर्ण केली


तुझ्यासाठी मानायचो देवाला, पण शत्रू आता ते झाले

एक मागणं केलं होतं देवाकडं, त्याने तेही पूर्ण नाही केले


तुझं वचन तू विसरणार नाहीस हा विश्वास आहे मला

वेळ बदलेल पण तू नाही बदलणार हा भरोसा आहे मला 


काही नको यानंतर बस शेवटची इच्छा पूर्ण कर

अधुरं अन अबोल प्रेम शेवटी समजेल मी झालं अमर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy