पुरस्कार
पुरस्कार
भरडल्या दुःखाचे हे पीठ आहे
भाकरीवर घामाचे हे मीठ आहे
अनवाणी पायाने राबला बाप माझा
उन्हांत जळत आली माझी माय आहे
झोपडीतल्या अंधारात शिकलो मी
नशिबी रोज गरिबीचा वनवास आहे
पायपीट झाली रोज पुस्तकांसाठी
शब्दाचे सारे आता हे उपकार आहे
ना प्रसिद्धीसाठी ना सत्कारासाठी
शोध जीवनाचा सत्य शोधण्यासाठी
लेखणीतून काढला हा एल्गार आहे
तेव्हा कुठे मिळतो मला पुरस्कार आहे
