STORYMIRROR

Vishwajeet Thite patil

Abstract Tragedy Inspirational

3  

Vishwajeet Thite patil

Abstract Tragedy Inspirational

वाटेवर काटे वेचीत चाललो...

वाटेवर काटे वेचीत चाललो...

1 min
335

वाटेवर काटे मी वेचित चाललो .

आयुष्याच्या कळ्या फुलवीत चाललो

सलले कित्येक काटे काळजात माझ्या 

प्रत्येक जखमेला ओवाळित चाललो.


आला कित्येकदा काळोख जीवनात

ज्ञानाची पणती उराशी धरून चाललो.

केला प्रयत्न वादळाने हरविण्याचा 

ढाल स्वतःचीच करून लढत राहिलो.


 बोलून खोटे बदनाम केले या जमान्यात 

 धरून कास सत्याची मी चालत राहिलो.

पटले ना कधी स्पष्ट बोलणे दूनेयेला

मी लेखणीतून जीवन सांगत चाललो.


भेटली ना कधी या जन्मात प्रीयेशी 

मी विचाराचा प्रियकर बनत चाललो

भाळलेना कुणी कधि चेहऱ्यावर माझ्या

मी शब्दाने काळजावर राज करीत चाललो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract