श्रृंगार
श्रृंगार


नटून थटून नवी नवरी बनून आले,
हिरवा शालू तुझ्यासाठी नेसून आले,
कपाळावर तुझ्यासाठी चंद्रकोर टिकली लावून आले,
तुझ्या नावाचं कुंकू भांगात भरुन आले
तुझ्यासाठी हातावर मेहंदी काढून आले,
माझे डोळे तुला पाहायला आतूर झाले
घाऱ्या डोळ्यांमध्ये काजळ लावताना
नकळत माझे तुझ्यावर प्रेम झाले
श्रृंगार कशाला हवा मला,
माझं हसू माझा चेहरा उजळवते,
मोगऱ्याच्या फुलांचा गजरा केसात माळते,
कानामध्ये मोठे झुमके घालून मी तुझे शब्द पाळते
हातात हिरवा चुडा खणखण वाजवू पाहते,
पायामधले पैंजण तुझ्या आठवणीत डोलू लागते,
सात जन्म साथ देशील ना रे मला,
तुला पूर्णता समजून मी माझे सौभाग्य मानते...