तुझे रिझर्व्ह हसणे -- उद्धव भयवाळ
तुझे रिझर्व्ह हसणे -- उद्धव भयवाळ
1 min
435
ओळखले मी तुझे रिझर्व हसणे
तुला पक्के आहे माहित की,
तुझे असणे म्हणजे माझे असणे
अन् तुझे नसणे म्हणजे माझे नसणे
सहजीवन म्हणजे तरी काय?
सोबत हिंडणे, सोबत फिरणे
सोबत उठणे, सोबत बसणे
एकमेकांचे अश्रू पुसून
वेळप्रसंगी दिलासा देणे
कधी खरे, कधी लटकेच
उगीच फुरंगटून बसणे
चेहऱ्यावरती न विसरता
हसू आणावे मात्र उसने
ओळखले मी तुझे रिझर्व हसणे