गुपीत
गुपीत
विणेला सप्त सुरांनी
छेडण्याचे गुपीत मला कळले
पहाट शृंगारात येण्याचे
गुपीत मला कळले
का धाक कळ्यांना उमलण्याचा
भवऱ्यांनी पराग शोषण्याचे
गुपीत मला कळले
बहर बावरा फुलांचा तिच्यासाठीच बहरतो
काट्यांनी उदास होण्याचे
गुपीत मला कळले
छंद तिचा फुले वेचण्याचा
फुलांनी तिला शोधण्याचे
गुपीत मला कळले
नकळत खुलतो गजराही वाणीवर
ओठ गुलाबी हसण्याचे
गुपीत मला कळले
का छेडतो हा लबाड वारा
फुलांनी हार होण्याचे
गुपीत मला कळले
पहात होती संध्या प्रणय फुलांचा
अंधाराने गर्द होण्याचे गुपीत मला कळले