तुझ्याशिवाय....
तुझ्याशिवाय....


खरच सांगतो
आयुष्यात तुच तर होतीस
तुझ्याशिवाय काय होते
तुला विसरणे शक्यच नव्हते
तुला मिळवणेही अवघड होते
मी तुझ्यावर प्रेम करत राहीलो
तू कधी केव्हा नजरेआड
झालीस कळेच नाही
तू अचानक भेटलीस
मला पाहून विचारात पडलीस
तुला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय
बोलून गेलीस
मी त्याच क्षणी अबोल झालो
अश्रूंना डोळ्यातुन येवू न देता
तुला पाहात राहीलो
मी आयुष्यभर तुझ्याच विरह सांभाळून होतो
तू मात्र सुखात जगतं होतीस
कधीतरी तू त्या वळणावरून
मागे वळून बघायची
तिथे मी आजही
तुझ्या आठवणीत येत असतो
बस दुःख एकचं
त्या मावळत्या सूर्याला
माझ्या खोट्या प्रेमाची व्यथा ऐकवतो