खरी खोटी माणसे
खरी खोटी माणसे


खोट्या माणसापुढे
खऱ्या माणसाला झुकावे लागते
असत्याला सिंहासन तर
सत्याला फाशी असते
खोट्या माणसाचा विजय ईथे
खऱ्याचा पराभव होतो
असत्याचा जयजयकार
सत्याचा तिरस्कार असतो
खोट्या माणसाच्या डोक्यावर हारतुरे
खऱ्याच्या पाठीवर घाव असतात
खोटं बोलणारे खांद्यावर
खरं बोलणारे पायदळी दिसतात
खोट्या माणसाला सन्मान
खऱ्याला अपमान मिळतो
खोट्याला माणसाला फुलांच्या पायघड्या
खऱ्याला काट्यांचा सडा असतो
खोट्या माणसांचे जगणे
खऱ्याचे मरण असते
पापपुण्य असत्याची भिती
खोट्या माणसाला नसते
खोट्या माणसाला पुढे
खऱ्याला मागे ठेवतात
खोट्याच्या चरणी माथा
खऱ्या माणसाला लाथा लावतात
खरतर...
खोट्या माणसापुढे
खऱ्यालाच नतमस्तक
व्हावे लागते
खोटेजरी असते तरी
खऱ्याला तोंड शिवून
घ्यावे लागते
पण सत्याचा खरेपणा
सिध्द होण्यासाठी
खुप वाट पहावी लागते
किती ही लपवले खोटे
तरी एक दिवस प्रसिद्ध होतच असते