एक तरी जीवलग हवा
एक तरी जीवलग हवा
आयुष्यात एकतरी जिवलग असावा
जो आधार देईल
सुख दुःख समजून घेईल
भावनांचा आदर करून
हळव्या मनाला जपुन पाहिल
आयुष्य एकतरी जिवलग असावा
जो संकटात उभा राहिल
वेदना समजून घेईल
डोळ्यातुन अश्रु येवू न देता
रूसव्या ओठांना हसवतं ठेवील
आयुष्यात एकतरी
जिवलग असावा
जो प्रत्येक वळणावर
धीर देईल
होकार दिल्यावर धवतं येईल
अडचणीत सोबत राहून
जखमावर हळुवार फुकंर घालीन
पडल्यावर हात देईल
खचल्यावर साथ देईल
भेटल्यावर आपलं म्हणून पाहील
काळजात कुठेतरी हक्काने राहील
पाठराखण करताना मनावरची मरगळ दुर नेईन
आनंद देणारा
लढायला बळ देणारा
सौख्य नादंवणारा
काळजीने सांभाळून घेणारा
असाच काही
एकतरी जिवलग आयुष्यात असावा...