जीवन हे क्षणभंगुर आहे
जीवन हे क्षणभंगुर आहे


या दोन घडीच्या जगण्यासाठी
क्षण सुखाचे
मोजून घ्यावे लागते
तोलून मापून जगावे लागते
हसणे आता उसणे झाले आहे
हसण्यासाठी हसु शोधावे लागते
जाळे दुःखाचेतर घरोघरी दिसते
चिंता दारावर पहारेकरी असते
संकटाना तरी किती दुर करावे
सुखाच्या कशीद्यावर
वेदनेची पायवाट असते
जगणे विसरून गेला माणूस
कळत नाही कुठे धावतो आहे
सौख्य समृद्धीच्या नादात
श्वास विकत घेतो आहे
जीव व्हेंटिलेटरवर असतो तेंव्हा
खरच जगता आले नाही म्हणतो आहे
माणूस कधीच
स्वतःसाठी नसतो
फक्त पळत असतो
वितभर पोटासाठी
दोन घास पुरेसा असतो
दोनवार कपड्यातही
माणूस देखना दिसतो
त
रीही माणूस
श्रीमंत व्हायचे म्हणतो
या माणसांच्या गर्दीत
वाट मोकळी नसते
तरी पुढे जायला वाट काढत असतो
जगून घेतो माणूस
मंदिरात माथा टेकून
वाढवून घेतो आयुष्य
एक रूपया देवून
स्वार्थ माणसाचा पाहून
देवही म्हणतो
मी का देवरूप घेतले
रोज गाऱ्हाणे ऐकून
कान माझे फुटले
मागणे माणसाचे कधीच सरत नाही
आत देवच माणसापुढे
नतमस्तक होवू लागले
तेव्हा जीवन हे
क्षणभंगुर झाले आहे
आज जगला तो जगला
उद्या काय होईल माहीत नाही
मग कशाला करायची मरणाची घाई
वय वाढले तरी
दोन घडीचा डाव खेळताना
लहान होवून जगायचं लहानपण देरे देवा
बस एव्हडचं देवा जवळ मागायचं