एक निवांत क्षण
एक निवांत क्षण


एक निवांत क्षण जुळले दोघांचे मन
तिथे नव्हते रंग रूप भेदभाव
नव्हते कोणाचेही गाव
नव्हता तिथे कोणाचाही
अल्ला आणि देव
त्या निवांत क्षणी होते फक्त
दोघांची प्रेमाची देवघेव
दूर कुठेतरी एकांतात
कसली जात कसला धर्म
नव्हता कोणाचाही पंथ आणि संत
घरही तिथे कोणाचेच नव्हते
त्या शांतप्रांत क्षणी
जुळले होते माणुसकीचे नाते