मंद धुंद वारा
मंद धुंद वारा
मंद धुंद वाऱ्याची झुळूक छेडत असते
म्हणून तिला पावसाची सोबत हवी असते
कारण पावसाची आणि तिची पक्की मैत्री होती
तिच्याशिवाय पाऊस पडणार नाही
याची तिला खात्री होती
मगं पाऊस आल्यावर ती सैरभैर व्हायची
तिला पाहून पावसाला
आनंदाची उकळी फुटायची
पाऊस यायचा नाही तेंव्हा गाल फुगवून बसायची
कधी येणार आहेस
ती आभाळाकडे बघुन
पावसाला विचारून घ्यायची
तिला रूसलेल पाहून वारा सुसाट व्हायचा
ती आडोसा घ्यायची
वारा तिला खिडकीतून बघायचा
वाऱ्याने तिच्या आंगा भोवती पिंगा घालनं
पावसाला नको वाटायचं
तिचं पुन्हां पुन
्हां लपुन बसनं
त्याच्या काळजाला भिडायचं
मग आभाळ काळेभोर व्हायचे
तिच्या गालावर गोडं हसु फुलायचे
पाऊस हळूहळू यायचा
ति धावत सुटायची
सरीना कवेत घेताना
चिंब चिंब व्हायची
वादळ वारा
तिचं भिजलेल रूपं डोळ्यात बंद करून घ्यायचा
तेव्हा रागाच्या भरात पाऊस जोरात सुटायचा
विजांचा गजर व्हायचा
तेंव्हा ती घाबरून पळायची
त्या पावसाचा लडिवाळा खिडकीतून बघायची
तिचं अस सोडून जाणे पावसाला नको वाटायचे
तिची सोबत नसल्याने आभाळ फाटायचे
पाऊस तसाच नाराज होवूनं
शातं व्हायचा
तिच दारात उभ राहणे
आभाळातून बघायचा