प्रीत बावरी
प्रीत बावरी


मुरलीचे ते सूर ऐकूनी
राधेची होई प्रीत बावरी||ध्रृ||
प्रीतीच्या या धूंद वाऱ्यावरी
मृदुगंध छेडतो तुझ्यापरी
मी राधा झाली बावरी
मन वेडे झाले रे श्रीहरी
राधेची होई प्रीत बावरी||१||
मनात चांदणे लखलखताना
हरपून जाई खुलता खुलता हसताना
धुंद धुंद या श्वासातूनी भारी
छेडून जाई तव सूर मुरारी
राधेची होई प्रीत बावरी||२||
कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण
जप चाले राधेच्या अंतरी
भावमनीचा येई दाटूनी
तव प्रीतीची ही रितच न्यारी
राधेची ही प्रीत बावरी||३||