स्वप्न
स्वप्न
काट्यांसवे फुलतात फुले
तशी रोज फुलते मी
दुःखास ठेवते झाकून
सुखास शोधते मी
स्वप्न जपले जे उराशी
ते पूर्ण करतेच मी
आशेच्या किरणावरती
रोज नव्याने झुलते मी
मिटता पापण्या अलगद
डोळ्यांमध्ये स्वप्ने उतरती
जाई जुईच्या सहवासाने
सुगंधित होऊन जाती
झुलते कधी वाऱ्यावरती
कधी डुंबते पाण्यामध्ये
राणी मीच असते
माझ्या नशिल्या स्वप्नामध्ये
शिल्पकार मी माझ्या
जीवना फुलवत नेते
श्रमाच्या हिंदोळ्यावर
जीवन गाणे सुंदर गाते