श्रृंगार
श्रृंगार


रूपाने गोरी असली जरी,
मनाने भोळी आहेस गं तू..
नऊवारी साडी घालुनी,
हृदयात घर करुनी गेलीस गं तू..
तुझ्या हातच्या मेहंदीत,
माझे नाव कोरेलेले..
कपाळी लाविशी कुंकू,
सात जन्मासाठी मांग भरलेले..
तुझ्या नाकाची नथ जणू,
तुझ्या शृंगाराचे प्रतीकच झाले..
गालावरच्या लालीने मात्र,
मनाला भुरळ घालतच गेले..
मृगनयनी नयनांच्या नजरेत,
माझे अस्तित्व दिसूनी आले..
लावता काजळ नयनांना,
सुखांची चाहूल देऊनी गेले..
तुझ्या माथ्यावरील चंद्रकोर जणू,
चंद्राही त्यात समावेल..
पायातील पैंजणाच्या आवाजाने,
हृदय पुन्हा मी गमवेल..