नात गुरु शिष्याचं..
नात गुरु शिष्याचं..

1 min

319
गुरु शिष्याच नात जणू,
जणू चंद्र तारे नभात..
चंद्र प्रकाशात नाहुनी,
नाहुनी तारे चमकत..
गुरु करे ज्ञान प्रदान,
प्रदान करूनी घडवी..
शिष्यची पाठ थोपटून,
थोपटून मार्ग दाखवी..
गुरु विना शिष्याची नाही
नाही जीवनाची घडण..
समाजात वागण्या करी,
करी शिष्याची उजळण..
गुरु असे मार्गदर्शक
मार्गदर्शक जीवनाचा..
सार्थक नाही जीवन हे
हे गुरु विना जगण्याचा..
गुरु म्हणजे आई बाप
बाप लढण्यासाठी ढाल..
तशी आई माझी माऊली
माऊली करते सांभाळ..