मादाम कामा..
मादाम कामा..


जन्म पारसी समाजी,
झाली क्रांती ज्योत ज्योत..
घेई कामा सहभाग,
क्रांती जोडीत जोडीत..
युरोप देश येता येता,
युवकांना एकत्र करी..
भारत स्वतंत्र होण्या,
लढते लढते नारी..
देश विदेश फिरुनी,
क्रांती ज्योत धरी धरी..
एकजुट होई सारे,
क्रांतिकारी क्रांतिकारी..
देशभक्ती मनी मनी,
लेखणीने प्रकाशित..
अर्थ सहाय्य करूनी,
घडे क्रांती क्रांती ज्योत..
जर्मनीत फडकवी,
ध्वज भारत भारत..
वन्दे मातरम् बोले,
देशभक्त होत होत..