रेशीम बंधनातलं नातं तुझं नि माझं...
रेशीम बंधनातलं नातं तुझं नि माझं...


रेशीम बंधनातलं नातं तुझं नि माझं,
आयुष्यभराची साथ देऊनी जाते..
कधी रक्ताच्या नात्यात तर,
कधी मैत्रीच्या बंधनात गुंफुनी जाते..
सोशल मीडियाचा आधार घेऊनी,
तासन् तास आठवणींनी उजाळा देत असते..
कधी मेसेजने तर कधी कॉल करुनी,
बहीण भावाचं नातं जपत असते..
रक्षाबंधन येता,
रेशीम बंध मज तू बांधते..
कधी येणं झालं नाही म्हणून,
पोस्टाने राखीचे बंध पाठवते..
कधी बहीण म्हणून,
तर कधी मैत्रिणीचे नातं तू जपतेस..
माझ्या प्रत्येक हट्टासाठी,
आई बाबांना तूच मनवतेस..
म्हणूनच..
तुझं नि माझं रेशीम बंधनातलं नातं..
खूपच सुंदर आहे..
तुझं येणं म्हणजे मायेची छाया,
तर कधी मैत्रिणीचे रूप आहे..