आठवणीतील मोरपिसे...
आठवणीतील मोरपिसे...


वेगवेगळ्या ठिकाणांहून येता,
कॉलेजला ऍडमिशन घेतो..
सिनियारिटीच्या नावाखाली,
न्यू स्टूडेंटची रॅगिंग करतो..
मित्र-मैत्रिणींसह लेक्चर बंक करता,
कॅन्टीनमध्ये चहा-बिस्कीटने सुरुवात होते..
मित्र-मैत्रिणींच्या साथीने,
प्रेम प्रकरणाला साथ देते..
कॉलेजच्या कट्ट्यावर जरी,
मिळाली साथ साऱ्यांची..
व्हॅलेंटाईन डेला मात्र,
गर्दी असते प्रेमवीरांची..
कंबाइन स्टडी म्हणता,
मुवीचे तिकीट फाटते..
एक्झामच्या काळात मात्र,
साऱ्यांचे टेन्शन वाढते..
कॉलेज संपून जाता,
मनातली किलबिल वाढते..
सॅन्डॉपच्या पार्टीमध्ये,
कॉलेज लाईफची आठवण सारे काढते..