खुडलेली कळी ..
खुडलेली कळी ..


काय पाप माझे जे,
दिल्या मला यातना..
आईची माया मिळे
आधीच केला नाश ना..
खुडलेली कळी मी,
गर्भातच मला मारले..
जन्म देणं जमल नाही तर,
कशाला मला गर्भात पाळले..
माझी चाहूल होताना,
आईला सुख आवरत नव्हते..
माझ्या जाण्याने मात्र,
तिला कोणीच सावरत नव्हते..
बापाची लेक म्हणता,
मग वंशाला दिवाच का मागत..
डॉक्टरला पैसे चारून,
गर्भातच मला का मारता..
लक्षात ठेवा जन्म देणारी,
पण एक नारीच आहे..
माझ्या विना ही दुनिया ,
तुम्हा सर्वांना सूनीच आहे..
आई, बहीण, पत्नी पाहिजे,
पण नको यांना हो मुलगी..
गर्भात नाश करून माझा,
वंशाचा दिव्याची आसच ठेवती..