बहिण भावाच नात..
बहिण भावाच नात..
1 min
447
बहीण भावाच नात खूप सुंदर असत..
दुर असल जरी एकमेकांपासून,
तरी मनात घर करून असत..
आठवण येताच तासभर गप्पा,
तर कधी जुन्या आठवणी काढत असत..
रक्षाबंधनाला येणं जमल नाही म्हणून,
पोस्टाने राखीचे बंध पाठवत असत..
सोशल मीडियाच्या काळात,
दुर असलेले नात पण जवळ भासू लागतं..
कधी व्हिडिओ कॉलिंगने,
तर कधी मॅसेज करून बोलू लागतं..
बहिणीच रुसन - फुगण,
कधी तरी चालू असतं..
तर चॉकलेट मिळताच रुसन विसरून,
लगेच हसणं बोलणं चालू होत असतं..
म्हणूनच..
बहीण भावाच नात खूप सुंदर असतं..
मन मोकळं करणार ठिकाण असतं..