मिटलेले डोळे
मिटलेले डोळे


मिटलेले डोळे हे माझीच,
अंतयात्रा पाहत होते..
आसवांच्या शब्दांनी सारे,
माझी आठवण काढत होते..
आठवणींच्या पिंजऱ्यात,
सर्वांचे मन हे गुंतलेले होते..
सुख दुःखाच्या जाळ्यातून,
देह माझे सुटलेले होते..
न कळत भावना दुखावलेले,
ते ही आज रडताना दिसत होते..
शब्दांचा बांध फोडूनी,
माझे जीवन सर्वांना सांगत होते..
आज कळतंय,
जीवन हे एकदाच मिळणार होते..
नात्यांची जपवणुकीत,
मन हे नेहमी अडकणार होते..
नात्यातली जपवणूक मी,
मिटलेल्या डोळ्यांनी पाहत होतो..
आसवांच्या शब्दांनीच,
माझी अंतयात्रा मी सांगत होतो..