रंग
रंग


सौंदर्य तुझे
करते घायाळ
वाणी तुझी
खूपच मधाळ.......
नयन तुझे गं
जसे हरिणाक्षी
रंग ओठांचा गं
मस्त गुलबक्षी......
काया तुझी सखे
खूपच मऊ
चल जरा आपण
बागेत फिरून येऊ.....
गळा तुझ्या गं
सखे मोतीहार
मंगळसूत्रात तुझ्या
सौभाग्याचे सार.....
भाळी बिंदिया
सुरेख लाल, लाल
खळी शोभे गालावर
तुझे गुबगुबीत गाल.....
बांगडी तुझ्या हातात
किणकिण करी नाद
पैंजण रूणझुणते छान
मज घालीते गं साद.....