पाऊस
पाऊस
अचानक आलेली सर चुकवताना
गर्द पिवळ्या ओढणीला धक्का लागला..
माझा साॅरी घशातच अडकला...
जेव्हां ठिबकण्यार्या बटानीं मागे वळून विचारले..
"कसा आहेस"
वीस वर्ष अन् स्टेशन कोसळून पडल एकाच पावसात..
पाय ओढत आंवढे अन् ओले डोळे
मला गर्दीतच टाकून घरी आले...
मागे लागलेल्या हजारो आठवणी दारातच
थबकल्या अन् हळूच सटकल्या...
जेव्हां बायकोने विचारले
"तू छत्री मिटून भिजत का आलास"

