आठवण
आठवण
तुझी आठवण माझी नशा झाली आहे.
माझ्या वर्तमानाचे जीवन अन् जीवनाचे भविष्य झाले आहे
माझ्या गीतांचे सूर झाले आहे अन् सूरांचे अर्थ झाली आहे
तुझी आठवण माझी नशा झाली आहे
जागेपणीचे अश्रू अन स्वप्नातील हसू झाली आहे
न उमजणारे भाव अन् जिव्हारी लागलेले घाव झाली आहे
भर गर्दीतही एकटं पाडणारी
तुझी आठवण माझी नशा झाली आहे
कधी छळणारी नरकपुरी तर कधी स्वर्ग परी झाली आहे
उमलणारी कळी तर कधी फासाची दोर झाली आहे
अपराधावाचून शासन करणारी ती,
तुझी आठवण माझी नशा झाली आहे
मन रमणारी रमणी अन् आकाशतली चांदणी झाली आहे
आता नकोच छळणारी तू आयुष्यात माझ्या,
आयुष्य जाळणारी आठवण तुझी माझी झाली आहे

