STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

गंध

गंध

1 min
240

गंध कोवळ्या फुलांचा

भरे तनमनामधी

चित्तवृत्ती प्रफुल्लित

मन प्रसन्न गंधामधी


रम्य पहाटेची वेळ

दवबिंदू शिंपलेले

झाडावरी अलगद

फूल छान डोललेले


रंग कुणाचा पांढरा

केसरिया देठ असे

लाल गुलाबी पिवळा

रंग अबोलीचा दिसे


नयनांत भरे रंग

गंध किती सांगू नाना

पहाटेच्या प्रहराला

देती आल्हाद मनाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract