महालक्ष्मी
महालक्ष्मी
यावे माझ्याघरी, जेष्ठ गौरा आई
कनिष्टा गौराई, नारायण।।धृ।।
खण नाराळाची, बदाम बियांची
धान बांगड्यांची,ओटी भरी।।१।।
खारीक खोबरं,शोभतो मखरं
हत्ती घोड्यावर,घाई करी।।२।।
आले गणराज, झाले तीन रोज
बैलं पोळा साज, वाट पाही।।३।।
केणा नि आगाडा,हिरवा तो चुडा
बेलपत्री सोळा,आसुसली।।४।।
विड्याची ही पान,केळी आंबा वान
हळकुंड छान, जमविली।।५।।
फुलं गुलाबाची,आणि कमळाची
घड ती केळीची,उमलली।।६।।
रासी पाच माते,सोळा भाज्या माते
शेव चकली माते,तळलेंली।।७।।
हळद नि कुंकू, राधा मीरा रिंकू
आई मामी काकू,पुजतील।।८।।
सौभाग्याच लेन,नथ बिंदू भान
कुंकवाच दान,भाळी भार।।९।।
धुप राळं आता,अगरबत्ती पुडा
दिव्यांची आरास,रचियली।।१०।।
लाडू नि कान्होले,पुरी भजी वडे
फुलोरा ही डुले ,डोईवर।।११।।
आवतन तुम्हा,विनवनी तुम्हा
आशिर्वाद आम्हा,असू द्यावा।।१२।।
