STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Abstract Others

3  

Mahesh V Brahmankar

Abstract Others

पाऊस आला

पाऊस आला

1 min
245

पाऊस आला, जसा आनंदाचा वर्षाव झाला, सर्वदूर सुगंध तो मातीचा पसरला!

पशू पक्ष्यांचा किलबिलाट झाला, धरणी मातेने हिरवा शालू जणु परिधान केला!!

गवताच्या पात्यांवर ते पसरले दवबिंदू!

रंगीबेरंगी फुलपाखरू, इकडून तिकडे लागले बागडु!!1!!


पावसाचे आगमन होताच, चंद्रकळा उमलली शेतकऱ्याच्या मुखावर!

वेळ न दवडता म्हणी चला करू, पेरणी भरभर!!

गारवा येताच कोकिळा करते कुहु कुहु!

चहुबाजूंनी पसरला, आनंद बहु!!2!!


 जँगलात म्हणे भरली प्राण्यांची सभा, चला भिजू या, बागडू या पहिल्या पावसात!

व्याकुळ होतो आपण तृष्णेने, चला तहान भागउया आपण आज, जलयुक्त शिवारांच्या डबक्यात!!

बालगोपाल नाचू लागली, झाले ओलेचिंब पावसाच्या सरींनी!

किती पांडुरंगाची किमया ही, चला सर्व आज नाचू, कीर्तनाचे रंगी!!3!!


प्रियकर म्हणतो प्रेयसीशी, चल भिजू या चिंब पावसात!

गुलाबाची कळी उमलेल, तुझ्या ओठांवरती साक्षात!!

प्रिये चल जाऊ!

हरित तृणांच्या मखमालीवरती, आपण प्रीतीचे गाणे गाऊ!!4!!


देवा असू द्या साथ तुमची!

गरजेनुसार सदैव बरसू दे धार पावसाची!!

भरू दे सर्व धरणे, विहिरी, नदी, तलाव!

सर्व सजीव सृष्टीला, देवा तू पाव, देवा तू पाव!!5!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract