स्वयंभू
स्वयंभू
असे रवी स्वयंभू
देतो प्रकाश
देवा तुझे किती
सुंदर आकाश....१
असे चंद्र स्वयंभू
देई शितल प्रकाश
लुकलुकणाऱ्या चांदण्या
देती शुभ्र प्रकाश....२
असे स्वयंभू
माय ही धरती
पिकवून माणिक-मोती
जगा उध्दारती....३
असे स्वयंभू
निळे निळे आकाश
करती मुक्त विहार
पक्षी,यान अवकाश ४
असे स्वयंभू
अग्नी दिव्य प्रकाश
उजळोनी टाकी
घरभर प्रकाश....५
असे स्वयंभू सागर
अनंत जलसिंचन
सर्व सरितांचे
जणू माहेर....६
असे स्वयंभू शूरवीर
छत्रपती शिवाजीराजे
स्वराज्याचा डंका
साऱ्या जगात गाजे...७
असे स्वयंभू
वीर शंभुराजे
धर्मवीर पुत्र
तिन्ही लोकी साजे....८
असे स्वयंभू
माय माझी साऊ
ज्ञानदान दिलेस
किती गुणगान गाऊ...९
असे स्वयंभू
माझा बाप शेतकरी
पिकवून धानशेती
करी जगाची चाकरी...१०
