पोट....
पोट....
हव्यासी आणि क्रूर नजरेनं
पाहणार्या त्या हैवानांची
पोटं कधीच भरत नाहीत...
अश्लिलतेची भूक आ वासून आपली जबडी उघडी करून
बसलेली असताना वासनेच्या आहारी गेलेल्यांना वयाची तमा आता उरलीच नाही..
क्रूरतेच पोट आजपर्यंत कधी भरलच नाही.....!
पेटविल्या मशाली तिथं
कुणी दिवे लाविले श्रद्धांजलीचे
मेणबत्य्यांच्या रांगोळीत लोट वाहिले धुरांचे....
भरलेली पोटं पुन्हा मोकळी होतात
आणि निर्भयपणे आभाळात सावज शोधू लागतात....
घाव घालून सावजाच्या कातडीच्या चिंध्या चिंध्या होताना पोट भरल्यावर ते अमानूष चेहरे एकमेकांकडे पाहून हसतात....
वासनेनं हपापलेल्या त्या हैवानांची पोटं कधीच भरत नसतात..
उसवलेले धागे गोधडीची ऊब कमी करुन जातात...!
