STORYMIRROR

Umesh Dhaske

Crime

3  

Umesh Dhaske

Crime

वाट

वाट

1 min
145

भयान अंधारात

आक्रोशाच्या किंकाळ्या

जेव्हा आसमंत भेदून टाकतात

तेव्हा भूईसुद्धा आपलं दुःख

धायमोकलून व्यक्त करत असते...!


निरव शांततेच्या वाटा तुडवित चालताना

घामाच्या सरीत ती चिंब झाली होती

अंधारात काळ्या नजरांच्या गिधाडांनी

तिची वाट रोखली होती...!


वृक्ष वेली रोपटी अगदी शांत

आणि स्तब्ध होती..

भूईवरची माती मात्र चिंब 

झाली होती....!


पाचोळ्यांनी भूईवर 

आग ओतली होती..

गिधाडांनी तिच्या आतड्यांची

चव चाखली होती....!


किंकाळ्यांना आक्रोशांना

धर्म जातीची बंधनं नव्हती..

चिटपाखरंही अंधाराला

नमतं घेत होती...!


तडफडली ती फडफडली

किंचाळली ती विवळली..

कुणी नव्हतं त्या आवाजाला

साद घालायला येणारी...!


दडून बसली होती सारी

गुन्ह्याच्या अन आरोपांच्या भितीनं...

लपून बसली होती सारी

जबाबाच्या भितीनं...!


कुणी घरट्यात,कुणी ढोलीत

कुणी बीळात कुणी जाळीत..!


गिधाडांनी तिची आब्रु

अंधारात चिरली होती..

किंकाळी आक्रोशाची

भूईत जणू विरली होती...


उडून गेली गिधाडं

लचके कातडीचे घेऊन

कुणा वाटले नाही

क्षणभर तीला यावे पाहून....!


सगळे चिडिचूप झाले होते

अंधारातही अन उजेडातही

घिरट्या घालणारी गिधाडं

तीच वाट धुंडाळत होते


घिरट्या घालणारी गिधाडं

तीच वाट धुंडाळत होते...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime